Breaking

Saturday, July 25, 2020

... तर महाराष्ट्रात बुलेट ट्रेन होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे https://ift.tt/2WWAEHG

मुंबई: मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर यांनी पुन्हा एकदा मुंबई-सूरत बुलेट ट्रेनवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनचं समर्थन करेल असा गैरसमज करून घेऊ नये. माझं मत लोकांच्यासोबत असल्याने नको आहेच, आता सुद्धा सगळ्यांनाच बुलेट ट्रेन नको असेल तर महाराष्ट्रात बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नेते यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनबाबत त्यांची भूमिका व्यक्त केली. बुलेट ट्रेनबाबत स्थानिक लोकांचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलं आहे. तसंच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या. मला आनंद होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुंबई-सूरत बुलेट ट्रेनची आता काही आवश्यकता नाही, पण भूसंपादन करताना ज्यांचा विरोध झालाय त्यांच्या मागे शिवसेना… शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचंय तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्या मागे शिवसेना आहे. आता काही जणांनी स्वतःहून जमीन दिली असेल तर काय करणार, असं सांगतानाच बुलेट ट्रेन जरी असली तरी बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही किंवा कोणी विचारपूसही करत नाहीय. यावरही आता सरकार म्हणून निर्णय घेताना राज्याच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. माझी भूमिका वैयक्तिक वेगळी असू शकते, जी अर्थातच जनतेसोबत राहण्याची आहे, पण राज्याच्या हिताचा विषय येईल, त्या वेळी यात हित आहे की अहित आहे याचा विचार करावा लागेल. माझं मत असं आहे की, सगळ्यांना एकत्र बोलावून आपल्याला हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्याला खरंच आता बुलेट ट्रेनची गरज आहे का? याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आता सरकार म्हणून आम्ही असताना या ‘का?’ची सोडवणूक करण्याची गरज आहे. ‘का?’ला काही कारणं आहेत का? खरंच यातून काही फायदा होणार आहे का दाखवा आम्हाला. काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेन आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WWbWqJ

No comments:

Post a Comment