Breaking

Monday, July 27, 2020

बकरी ईद: कुर्बानीवर भाजप आमदाराचे आक्षेपार्ह विधान, म्हणे... https://ift.tt/2WYeVz2

गाझियाबाद: भारतीय जनता पक्षाचे गाझियाबादमधील लोनी येथील आमदार यांनी बकरी ईदीनिमित्त देण्यात येणाऱ्या कुर्बानीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशात करोनाचा उद्रेक झालेला असून त्यामुळे दिली जाऊ नये आणि जर कुर्बानी द्यायचीच असेल तर मग स्वत:च्या मुलांची द्यावी, असे गुर्जर म्हणाले. जे कोणी कुर्बानी देतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, असेही गुर्जर म्हणाले. जुन्या काळात सनातन धर्मात बळी दिले जायचे, पण आता मात्र त्या जागी नारळ फोडून त्या जागी बळीची मूर्ती ठेवली जाते. आता बकऱ्याला कापले जात नाही. अशाच प्रकारे मुसलमान देखील आपली पवित्र गोष्ट, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत असे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर पुढे म्हणाले. तरी ही जर कोणाला बळी द्यायचाच आहे, तर मग त्याने स्वत:च्या मुलाचा द्यावा. मुक्या प्राण्यांना मारून त्यांचा बळी देणे आणि मग त्यानंतर त्यांना खाणे .... पुढील जन्मात त्यांना बकरा बनावे लागेल आणि त्यांना लोक खातील, हा निसर्ग नियम आहे. जो जसे करतो त्याला तसे भरावे लागते, असेही गुर्जर पुढे म्हणाले. दरम्यान, देशात करोना संसर्ग तीव्र गतीने वाढत आहे. अशात सरकार लोकांना सतत धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळावेत असे आवाहन करत आहे. आणि इतर सण लोकांनी घरातच साजरे करावेत असे आवाहन करण्यात आले आहेत. दरम्यान, कोणीही आपल्या नमाज पढण्यावर बंदी घालू शकत नाही, असे संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटले आहे. हा मुसलमानांचा मोठा सण आहे. या दिवशी मुसलमान बाजारात जाऊन बकऱ्यांची खरेदी करतो. मात्र आता बकऱ्यांचे बाजार लागत नाहीत. अशा परिस्थितीत सण साजरा कसा होणार. बंदी घालणे योग्य नाही, असे शफीकुर्रहमान बर्क म्हणाले. खासदार शफीकुर्रहमान बर्क यांना भारतीय जनता पक्षाचे आमदार संगीत सोम यांनी धमकीच दिली आहे. जर समाजवादी पक्षाचे खासदार ऐकत नसतील तर ज्या प्रमाणे आजम खान यांची ईद तुरुंगात साजरी झाली, त्या प्रमाणे त्यांची बकरी ईद देखील तुरुंगात साजरी होईल, अशी धमकीच सोम यांनी बर्क यांना दिली आहे. बकरी ईदीला बकरा कापलाच पाहिजे असे कोणी सांगितले आहे. बटाटे खाऊन देखील ईद साजरी केली जाऊ शकते, असेही ते पुढे म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30U34Dq

No comments:

Post a Comment