Breaking

Sunday, July 26, 2020

शेअर बाजार ; निर्देशांक चढ-उताराच्या हिंदोळ्यावर https://ift.tt/303F1Tf

मुंबई : सध्या अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये कुरघोडी सुरु आहे. अशा स्थितीत जागतिक भांडवली बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांचे दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे याचे पडसाद शेअर बाजारात उमटतील, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी व्यक्त केले. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयसीआयसीआय बँकेच्या निकालाचा शेअर बाजारावर परिणाम होईल, असा अंदाज एमके ग्लोबल फायनान्शिअलचे एस. हरिहरन यांनी व्यक्त केला. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्याने शुक्रवारी १४ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान कंपनीचा समभाग चार टक्क्यांनी वधारून आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान रिलायन्सचा समभाग ४.३२ टक्क्यांनी वधारून २,१४९.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हा रिलायन्सच्या समभागाचा आजवरचा उच्चांक आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात कंपनीचे एकूण बाजारमूल्य १४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या समभागाने २,१४९.९० रुपयांची पातळी गाठली. शुक्रवारी सत्रांतर्गत व्यवहारांच्या अखेरच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) घसरणीसह बंद झाले. बाजार उघडताच १९०.८८ अंकांनी आणि ६५.५ अंकांनी खालच्या पातळीवर उघडला. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स ११.५७ अंकांनी घसरून ३८,१२८.९०च्या पातळीवर आणि निफ्टी २१.३० अंकांनी घसरून ११,१९४.१५च्या पातळीवर स्थिरावला. देशात संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांवर गेली आहे. कोरोना व्हायरसने देशात आतापर्यंत १४,११,९५४ जणांना संसर्ग झाला आहे, अशी रविवारची ही आकडेवारी आहे. covid19india.org ने ही आकडेवारी दिली. या आकडेवारीनुसार कोरोनाचे देशात ४ लाख ७७ हजार २२८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ९, ०१,९५९ जण करोनामु्क्त झाले आहेत. बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत ३२ हजार ३५० नागरिकांचा बळी गेला आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनाच्या विषाणूंची संख्या वाढू न देणाऱ्या, त्यांच्या संख्येवर अटकाव करणाऱ्या २१ औषधांची ओळख पटवण्यास संशोधकांना यश आले आहे. या संशोधनात अनेक संशोधकांचा सहभाग होता. यामध्ये काही भारतीय वंशाच्या डॉक्टरांचाही समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/301UO53

No comments:

Post a Comment