नवी दिल्ली: लॉकडाउच्या (LOckdown) काळात नशा करण्यासाठी नशेचे पदार्थ मिळाले नाहीत म्हणून एका व्यक्तीने चक्क चाकूच गिळून टाकला. एक वाटी पाण्यासोबत हा २० सेमी इतका लांबीचा चाकू या व्यक्तीने गिळून टाकला. त्यानंतर ही व्यक्ती तब्बल दीड महिना गप्प बसली. मात्र, त्यानंतर पोटात दुखायला सुरुवात झाली. ताप येऊ लागला. तपासणीत या व्यक्तीच्या पोटात चाकू आहे, असे आढळले. त्यानंतर त्या व्यक्तीला एम्समध्ये (AIIMS) दाखल केले गेले. तेथे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या व्यक्तीच्या फुफ्फुसात अडकेला चाकू बाहेर काढला. ही एक दुर्मिळ आणि मोठी अशी पहिलीच घटना आहे,असे एम्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. जे लोक व्यसनी आहेत अशांवर लक्ष देण्याची गरज असून त्यांच्या वागणुकीत काही बदल जाणवल्यास त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे नेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (man swallowed 20 cm ) हरयाणामधील पलवल येथील राहणारा हा २८ वर्षीय तरूण आहे. तो व्यसनाचा शिकार झाला होता. तो अनेक वर्षांपासून गांजा पित आला आहे. त्यामुळे त्याला सायकोसिस जडलेला होता. मात्र, त्यावर या तरुणाने उपचार केले नाहीत. ज्या व्यक्तींना सायकोसिस झालेला असतो, अशा व्यक्ती चमचे किंवा पीन गिळत असतात, मात्र अशा प्रकारे चाकू गिळणे ही पहिलीच घटना आहे, असे डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले. वाचा: या तरुणाला ताप आला आणि पोटात दुखायला लागले. त्यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तेथे एक्स-रे काढून पाहिले असता त्याच्या पोटात एक चाकू असल्याचे दिसले. आणि हा चाकू फुफ्फुसात अडकला होता. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला एम्समध्ये नेण्याचा सल्ला दिला, अशी माहिती एम्सच्या गॅस्ट्रोसर्जरी विभागाचे डॉक्टर निहार रंजन दास यांनी माहिती देताना सांगितले. वाचा: तरुणाच्या फुफ्फुसात पू झाला होचाय त्यामुळे हे ऑपरेशन करणेही कठीण झाले होते. ऑपरेशनपूर्वी ५ दिवस त्याच्या फुफ्फुसातून पू काढण्यात आला. त्याचे रक्तही कमी झाले होते. मात्र, चाकूने फुफ्फुसाच्या शिरांना नुकसाने केलेले नाही हे स्कॅनमध्ये दिसून आले. चाकूचा अर्धा भाग फुफ्फुसामध्ये घुसलेला होचा. या व्यक्तीने चाकू गिळताना तो हँडलच्या बाजूने गिळला असावा,असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोट कापून हा चाकू काढण्यात आला. ऑपरेशन ३ तास चालले. आता या रुग्णाची प्रकृती बरी आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jHuDs7
No comments:
Post a Comment