मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर यांचं आज निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ते अनेक दिवसांपासून इस्पितळात भरती होत्या. गुरुवारी १ वाजून ५२ मिनिटांनी हृदयविकाराच्या धटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. आज मालवणी, मालाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होती. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ये इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांनी काम करणं कमी केलं होतं. ८० च्या दशकात त्यांनी श्रीदेवी यांच्या सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी विशेष गाजली. कंगना रणौतच्या मणिकर्णिकी सिनेमात त्यांनी काम केलं. तसेच २०१५ मध्ये आलेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न' सिनेमासाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तसेच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'कलंक' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत अखेरचं काम केलं. करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' सिनेमात सरोज खान यांनी 'तबाह हो गये' हे गाणं नृत्य दिग्दर्शित केलं होतं. या गाण्यावर माधुरी दीक्षितने ठेका धरला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VGkG3D
No comments:
Post a Comment