पुणे: राज्यात तीन चाकी सरकार आहे. पण या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हाती असल्याचं विधान मुख्यमंत्री यांनी केलं होतं. त्याची चर्चा रंगलेली असतानाच प्रत्यक्ष गाडीच्या स्टिअरिंगवरील आपलं कौशल्य दाखवलं दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात चालत्या गाडीतूनच अधिकारी-पत्रकारांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून चालत्या गाडीतून सर्वांना हात जोडून नमस्कार केला. त्यामुळे केवळ सरकारच्याच नव्हे तर गाडीवरील स्टिअरिंगवरही मुख्यमंत्र्यांची हुकूमत असल्याचं दिसून आलं. पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पुण्यात आले होते. दिवसभर अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जायला निघाले. शासकीय कार्यालयातून मुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांनी प्रश्न विचारण्यासाठी धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाडी सुरू असतानाच स्टिअरिंगवरील दोन्ही हात काढले आणि हात उंचावून पत्रकार आणि अधिकाऱ्यांना नमस्कार केला. नकळतपणे झालेल्या या प्रकारामुळे मात्र पुन्हा एकदा स्टिअरिंग कुणाच्या हाती? या विषयावरून चर्चा रंगली. दरम्यान, पुण्यात करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात येऊन स्थितीचा आढावा घेतला. कोविड १९ चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. करोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्णदर व मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. तर, महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय करण्यात येणार आहे. ते नायडू हॉस्पिटल येथे नियोजित आहे. मात्र, या परिसरात खासगी रुग्णालये खूप आहेत. याउलट पुणे शहराच्या दक्षिण भागात भारती हॉस्पिटल शिवाय अन्य रुग्णालय नसल्याने आरोग्य सेवेचा असमतोल आहे. यामुळे दक्षिण भागात रुग्णालय उभारणीसाठी आरक्षित असलेल्या स्वारगेट, लक्ष्मीनारायण थिएटर परिसरातील जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास नागरिकांना मदत होईल, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hU3T64
No comments:
Post a Comment