Breaking

Sunday, August 30, 2020

पालघर साधू हत्याकांड; आणखी एक पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ https://ift.tt/2QFm044

पालघर: येथे दोन साधूच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी दोन अधिकाऱ्यांसह तिघानां निलंबित करण्यात आलं होतं. तर काही जणांची बदली करण्यात आली होती. पालघर येथील गडचिंचले येथे दोन साधूंची जमावाने हत्या केली होती. यावेळी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून कासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अन्य तिघांना निलंबित करण्यात आले होते. तसेच काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस अधिकारी गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या हत्याकांड प्रकरणी गुन्हे शाखेनं १२ हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. 'लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. राज्य सरकारनं गुन्हे शाखेकडं प्रकरणाचा तपास सोपवला होता. दोन्ही आरोपपत्रात २५० हून अधिक लोकांना आरोपी करण्यात आलं असून या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ८०८ जणांची चौकशी केली असून ११८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. हे प्राथमिक आरोपपत्र असून चौकशी सुरूच राहणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात १५४ जणांना अटक करण्यात आली असून ११ अल्पवयीनांना ताब्यात घेतलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gD8Yi0

No comments:

Post a Comment