Breaking

Sunday, August 30, 2020

Coronavirus: देशात करोनाचा पुन्हा विक्रम; २४ तासांत ८० हजारांहून अधिक रुग्ण https://ift.tt/3jqfg6v

नवी दिल्ली: देशात करोनाचा संसर्ग () गेल्या आठवडाभरापासून तीव्र गतीने पसरत आहे. सलग पाचव्या दिवशी करोनाचे ७६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. रविवारी तर नव्या रुग्णांची संख्या ८० हजार ९२ पर्यंत पोहोचली, तर एकूण ९७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच २४ तासांमद्ये ८० हजारांहून अधिक रुग्ण आढळणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला आहे. तसे पाहिले तर मागील आठवडा संपताना ९ ऑगस्ट या दिवशी ६३ हजार ६५१ रुग्ण आढळले होते. ही संख्या कोणत्याही रविवारी आढळलल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक होती. मात्र ही संख्या आता खूपच मागे पडलेली आहे. (Coronavirus cases crosses 80,000 In A day In India) देशभरात या आठवड्यात विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये १३.१ टक्क्यांची वाढ दिसली, तर ही संख्या गेल्या आठवड्या १०.९ टक्के (त्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत) इतकी होती. सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत अधिक आहे. संख्येच्या दृष्टीने पाहता करोना विषाणू घातक असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक प्रकारच्या उपाययोजनांनंतरही रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. आकडेवारीवर एक नजर आकडेवारीवर एक नजर टाकल्यास देशात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजारांच्य आसपास (६५,५५०) पोहोचली आहे. अशा प्रकारे देशात करोना रुग्णांची एकूण संख्या ३६ लाख, १६ हजार ७३० वर पोहोचली आहे. तसेच या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७ लाख ६७ हजार ४१२ इतकी आहे. तसेच सक्रिय रुग्णांची सख्या ८ लाखांच्या (७,८४,७६८) आसपास आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक १ वर देशातील राज्यांचा विचार करता महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवरच पोहोचला आहे. राज्यात १६ हजार ४०८ रुग्ण आठळले. अशा प्रकारे महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशीही १६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, उत्तर प्रदेशात ६ हजार २३३ (पहिल्यांदाच ६,००० ची संख्या पार), राजस्थानात १,४५०, मध्य प्रदेशात १,५५८, छत्तीसगडमध्ये १,४७१ आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये ७८६ नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hND0Ry

No comments:

Post a Comment