मुंबई टाइम्स टीम गणेशोत्सवात कलाकारांना घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. काही मालिकांच्या सेटवर सुट्टी नसली, तरी काही ठिकाणी सेटवर सुट्टी देण्यात आली आहे. 'स्वामिनी' आणि '' या मालिकांच्या सेटवर गणेशोत्सवाची सुट्टी असल्यानं ज्यांना शक्य आहे असे बहुतांश कलाकार आपल्या घरी जाणार आहेत. लॉकडाउननंतर चित्रिकरण सुरू होऊन साधारणपणे सव्वा महिना झाला आहे. सध्या वेगानं शूटिंग करून एपिसोड्सची बँक करून ठेवण्यावर भर दिला जातोय. असं असलं, तरीही सेटवर गणेशोत्सवाची सुट्टी मिळून ज्यांना घरी जाणं शक्यं आहे असे कलाकार आपल्या घरी जाणार आहेत. तर ज्या कलाकारांना जाणं शक्य नाहीय ते कलाकार बाप्पाचं दर्शन ऑनलाइन घेणार आहेत. घरच्यांसह गणेशोत्सवाची मजा, मोदक, गोडधोड या सगळ्यासाठी या मालिकांतले कलाकार सज्ज आहेत. 'स्वामिनी' मालिकेतल्या कलाकारांना गणपतीनिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. उमा पेंढारकर त्यांच्या घरी दादरला, तर श्रीपाद पानसे, रेवती लेले पुण्याला आपापल्या घरी जाणार आहेत. कुंजिका काळविंटसुद्धा तिच्या घरी जाणार आहे. थोडी जास्त सुट्टी मिळाली तर अभिषेक रहाळकर तर नाशिकला घरच्या गणपतीसाठी जाणार आहे. तसंच 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतली अंकिता पनवेलकर पुण्याला तिच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणार आहे. प्रेक्षकांची लाडके बाळूमामा, अर्थात अभितनेता त्याच्या नातेवाईकांकडे गणेशदर्शनाला जाणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lfmwE7
No comments:
Post a Comment