Breaking

Wednesday, July 23, 2025

ऋषभ पंतला चेंडू लागला, रक्त आलं, मैदान सोडलं, नेमकं घडलं तरी काय, पाहा Video https://ift.tt/gz0OvJc

मँचेस्टर : ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांची जोडी चांगलीच जमली होती. पण त्याचवेळी ऋषभ पंतला दुखापत झाली. चेंडू लागल्यावर रक्त यायला लागलं आणि त्यामुळेच त्याच्यावर मैदान सोडण्याची वेळ आली. यावेळी नेमकं घडलं तरी काय, हे आता समोर आलं आहे.ही गोष्ट घडली ती ६८ व्या षटकात. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स अचूक गोलंदाजी करत होता. पण ऋषभ पंत हा आपल्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे पंत यावेळी फटका मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.६८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पंतच्य मनात नेमकं काय आलं, कोणास ठाऊक. पण या चेंंडूवर आपण कोणता फटका मारायचा, हे त्याने आधीच ठरवलं होतं. ख्रिस वोक्स यावेळी अचूक आणि भेदक गोलंदाजी करत होता. कोणताही चेंडू तो धावा काढण्यासाठी देत नव्हता. वोक्सने पंतवर चांगलेच दडपण बनवले होते. त्यामुळे पंत मोठा फटका मारून चूक करतो का, याकडे इंग्लंडचे लक्ष लागलेले होते आणि तीच गोष्ट यावेळी घडली.या षटकातीव चौथा चेंडू वोक्सने लेग स्टम्पच्या दिशेने टाकला होता. लेग स्टम्पवरचा चेंडू पंत नेहमीच मारायला जातो, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ख्रिस वोक्सने हा चेंडू थेट लेग स्टम्पवर टाकला. हा चेंडू पंत रिव्हर्स स्वीप मारण्यासाठी गेला. पण पंतचे टायमिंग यावेळी चुकले. त्याला हा फटका योग्यप्रकारे मारता आला नाही. या चेंडूने पंतच्या बॅटची कडा घेतली आणि तो थेट त्याच्या पायवर आदळला. हा चेंडू एवढ्या वेगाने टाकला होता की, पंतला यावेळी वेदना सहन झाल्या नाहीत. पंतने डॉक्टरांना पाचारण केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याच्या पायातून शूज काढला. त्यावेळी पंतच्या सॉक्सला रक्त लागलेलं होतं. जेव्हा पंतच्या पायातील सॉक्स काढण्यात आला, तेव्हा रक्त येत असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी पंतवर मैदानात उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे पंतला यावेळी मैदान सोडावे लागल्याचे पाहायला मिळाले. पंतला मैदानाबाहेर नेले आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. पण त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कारण त्याच्या पायामधून रक्त येत होते, जे थांबत नव्हते. चेंडू एवढ्या जोरात लागला असेल की, त्याला सूजही येऊ शकते. पण अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VWiOBCF

No comments:

Post a Comment