Breaking

Wednesday, August 26, 2020

शेअर बाजार ; सेन्सेक्स आणि निफ्टीची आगेकूच https://ift.tt/2YDaytX

मुंबई : शेअर निर्देशांकांनी बुधवारच्या सत्रात उच्चांकी स्थिती गाठली. ऑटो शेअर्सच्या मागणीने बाजारात तेजीची लाट दिसून आली. वाहन क्षेत्रासह बँक, ऊर्जा, धातू आणि आयटी स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. दिवसअखेर ७७.३५ अंकांनी वधारला व तो ११,५४९ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई २३०.०४ अंकांनी वाढून ३९,०७३.९२ अंकांवर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात टाटा मोटर्स (८.८९ टक्के), हिरो मोटोकॉर्प (६.४२ टक्के), इंडसइंड बँक (५.९६ टक्के), झी एंटरटेनमेंट (५.४० टक्के) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (२.४८ टक्के) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती एअरटेल (२.८७ टक्के), अल्ट्रा टेक सिमेंट (२.१७ टक्के), ब्रिटानिया इंडस्ट्रिज (१.६४ टक्के), एशियन पेंट्स (१.५१ टक्के) आणि मारुती सुझूकी (१.३१ टक्के) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांनी वृद्धी दर्शवली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.३८ टक्के आणि ०.६९ टक्के वधारले.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११०५ शेअर्स घसरले, १५२८ शेअर्सनी नफा कमावला तर १२४ शेअर्स स्थिर राहिले. देशांतर्गत इक्विटी बाजाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारी भारतीय रुपया ७४.३० बंद झाला. चीन-अमेरिका व्यापारातील वाटाघाटीत प्रगती दिसून आल्याने बाजाराला प्रोसाहन मिळाले. युरोपियन बाजारात किंचित घसरण झाली. नॅसडॅकने ०.७६ टाक्यांनी वाढ घेतली तर निक्केई २२५ ०.०३ टक्क्याची घट झाली. हँगसेंगचे शेअर्स ०.०२ टक्क्यांनी वाढले. सीजी पॉवर अँड इंडस्ट्रिअल सोल्युशन्स लिमिटेड या शेअरने सलग ९ व्या व्यापारी सत्रात कंपनीच्या २.२९ कोटी शेअर्सची देवाणघेवाण झाल्याने कंपनीचे शेअर्स ४.८६ टक्क्यांनी वाढले. इंडियाबुल्स हौसिंग फायनान्सचा शेअर ५.६७ टक्क्यांनी वाढले व २१८ रुपयांवर बंद झाला.जेएमसी प्रोजेक्टने ५५४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. दक्षिण भारतातील बिल्डिंग प्रोजेक्टचा त्यात समावेश आहे. ही ऑर्डर एकूण ३१५ कोटी रुपयांची आहे. कंपनीला महाराष्ट्रातील २३९ कोटी रुपये किंमतीच्या कारखान्यांचा प्रकल्पही मिळाला. परिणामी, कंपनीचा शेअर १२.६४ टक्क्यांनी वाढला आणि ६०.१५ रुपयांवर बंद झाला. पुढील तीन वर्षात टाटा मोटर्सने घेतलेल्या ऑटोमोटिव्ह कर्ज शून्य पातळीवर कमी करण्याच्या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी जोरदार स्वागत केले. कंपनीच्या शेअरमध्ये ८.८९ टक्क्यांची वाढ झाली व तो १३८.४० रुपयांवर बंद झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YF0O2p

No comments:

Post a Comment