Breaking

Sunday, August 30, 2020

करोनाचा स्फोट झाला तर विरोधी पक्ष जबाबदार घेणार का?; शिवसेनेचा सवाल https://ift.tt/2Z5D2x1

मुंबई: लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण करोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय?, असा सवाल करतानाच मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे पाहू, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपने केले. त्यापाठोपाठ वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिनी मंदिर उघडण्यासाठी आज आंदोलन होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक 'सामना'तून विरोधकांना झोडपून काढण्यात आलं आहे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे. शिवसेनेची टीका >> सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पणसध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने काल सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. >> एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मशिदी उघडण्याची आरोळी दिली म्हणून पुढाऱ्यांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता ‘घंटा’ वाजवणे हे बरे नाही. मुळात सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे का बंद करावी लागली? देवांना बंदिवान का व्हावे लागले? याचा सारासार विचार करून याप्रश्नी विरोधकांनी मतप्रदर्शन करणे गरजेचे आहे. >> मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती ही महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते, गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग तर केलाच, परंतु कठोर साधनादेखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत काय? दोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असते, तर अनेकांना राजकीय खुर्चीप्राप्ती हाच मनःशांतीचा मार्ग वाटतो. क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांना फासावर जाण्यापूर्वी मनःशांती प्राप्त झाली होती. वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पाच तोफांचे आवाज ऐकून कमालीची मनःशांती मिळाली होती. मनःशांती राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्यातही असते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31HZxd1

No comments:

Post a Comment