Breaking

Monday, August 3, 2020

पडझडीचे सावट ; शेअर बाजारांवर नफेखोरांची मजबूत पकड https://ift.tt/31e7hBT

मुंबई : कोविड-१९ संसर्गाची भीती गुंतवणूकदारांमध्येही वाढू लागली आहे. याचे स्पष्ट प्रतिबिंब सोमवारी भांडवल बाजारांत दिसले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा ६६७.२९ अंकांनी धुव्वा उडाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १८१.८५ अंकांनी खाली आला. अशीच परिस्थिती आजसुद्धा पहायला मिळेल, असे मत जिओजित फायनान्शिअलचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. अशा पडझडीत चांगले शेअर खरेदी करण्याची गुंतवणूकदारांना संधी आहे, असा सल्ला ही त्यांनी दिला. सोमवारी ठरवणाऱ्या ३० कंपन्यांपैकी कोटक महिंद्र बँकेच्या समभागात सर्वाधिक ४ टक्के घसरण नोंदवली गेली. त्याखालोखाल इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो व रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांचे समभाग खाली आले. भांडवल बाजार विश्लेषकांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व एचडीएफसी बँकेच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे समभाग पडले. वाचा : रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांच्या मते करोनाने जगभरातील अनिश्चितता वाढवली आहे. त्यामुळे साहजिकच भांडवली बाजारात आता नकारात्मक वातावरण दिसेल. मोतीलाल ओसवाल शेअर ब्रोकर्सच्या चंदन तपारिया यांच्यामते नकात्मक संकेतांनी निफ्टी १०८०० अंकांखाली येईल. पुढे विक्री वाढली तर तो १०६५० ते १०६०० या स्तरावर राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. देशात तसेच जगभरात कोविड-१९ (करोना) संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रे चिंताग्रस्त आहेत. औद्योगिक क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. या क्षेत्राचे भवितव्य अनिश्चिततेच्या टप्प्यावर आले असल्याकारणाने कंपन्यांमध्ये पैसा गुंतवण्यास सर्मसामान्य गुंतवणूकदार धजावत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. आतापर्यंत जगात १.८० कोटींहून अधिक व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. भारतात १८ लाखांपेक्षा अधिक व्यक्ती करोनाबाधित आहेत. यामुळे भांडवल बाजारांत आणि मुख्य म्हणजे गुंतकवणूकदारांमध्ये गुंतवलेल्या पैशाचा योग्य परतावा मिळण्याविषयी भीतीचे वातावरण आहे. शांघाय, टोक्यो, सेऊल या भांडवल बाजारांत सोमवारी सकारात्मक वातावरण पहायला मिळाले. मात्र हाँगकाँग शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर पडला. युरोपातील भांडवल बाजारांनी सुरुवात सकारात्मक केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल ०.६९ टक्के घसरत ४३.२२ डॉलर राहिला. सोमवारी भारतीय रुपयानेही गुंतवणूकदारांची निराशा केली. भारतीय रुपया एका अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी पडला. यामुळे विदेशी चलन बाजार बंद झाला तेव्हा एका अमेरिकी डॉलरसाठी ७५ रुपये मोजावे लागले. यापूर्वी शुक्रवारी रुपया ७४.८१ या स्तरावर स्थिरावला होता. मोठ्या प्रमाणावर विदेशी कंपन्यांनी भांडवल काढून घेणे, डॉलर सातत्याने सक्षम होत गेला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2BWv1lB

No comments:

Post a Comment