Breaking

Monday, August 3, 2020

हुश्श! ; पेट्रोलियम कंपन्याकडून इंधन दर 'जैसे थे'च https://ift.tt/31fbDc6

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे.चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४४ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चाट बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांच्या ताब्यात देशातील ९० टक्के रिटेल विक्री केंद्रे आहेत. या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुद्ध इंधनाच्या मागणीमध्ये डिझेलची मागणी दोन पंचमांश असते. ही मागणी जुलै महिन्यात १३ टक्क्यांनी कमी नोंदवली गेली. या महिन्यात ४.८५ टन डिझेलची विक्री झाली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ही मागणी २१ टक्के होती, असे इंडियन ऑइलचे म्हणणे आहे. शुद्ध इंधनाची किरकोळीतील मागणी सातत्याने घटत चालल्यामुळे तेल शुद्धीकरणाच्या प्रमाणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे याचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर आणि पर्यायाने आर्थिक ताळेबंदावरही होई लागला आहे. जुलै महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत २८ वेळा डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. ७ जुलैपासून डिझेल १.११ रुपयांनी वाढले आहे. तर जवळपास २१ दिवस पेट्रोलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी २९ जून रोजी पेट्रोलमध्ये ५ पैशांची किरकोळ वाढ झाली होती. डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. मच्छिमार बोटींसाठी डिझेलचा वापर केला जातो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवरच चालतात. डिझेलमध्ये होत असलेली दरवाढ या घटकांचा खर्च वाढवणारी आहे. इंधन दरवाढीने येत्या काही आठवड्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2D92biB

No comments:

Post a Comment