Breaking

Monday, August 17, 2020

...तर सुशांतसिंह सुपरस्टार झाला असता: आठवले https://ift.tt/31UEx1i

मुंबई : स्टार असो की नसो प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा आहे. त्या प्रमाणे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहीजे. सुशांतसिंह अल्पावधीत लोकप्रिय स्टार झाला होता. त्याचा मृत्यू झाला नसता तर भविष्यात तो मोठा सुपरस्टार झाला असता. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी ही रास्त मागणी असून यात कोणतेही राजकारण नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी व्यक्त केले आहे. मुंबई पोलिसांचा संपूर्ण जगात नावलौकिक आहे. मात्र तरीही या पूर्वी अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा अर्थ कोणी काढू नये. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या मुंबई पोलीस करीत असलेल्या चौकशीत मुंबई पोलिसांच्या नावलौकिकाला न शोभणारी संथगती आहे, असे रामदास आठवले म्हणाले. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन सारख्या महान कलाकाराला सुरुवातीच्या काळात काम मिळत नव्हते. त्यांना खूप संघर्ष करावा लागला. बॉलिवूडमध्ये काही प्रमाणात कलाकारांना चांगला वाईट अनुभव येत असतो. सुशांतसिंहवरही अन्याय झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांतसिंह मृत्यूची सीबीआय चौकशी होणे योग्य असून यात कोणतेही राजकारण नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सुशांताचा मृतदेह आढळून आला होता. त्यानं आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं होतं. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असं असलं तरी सुशांतचा मृत्यून नेमका कसा झाला याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iNbG60

No comments:

Post a Comment