मुंबई: देशाचे केंद्रीय गृहमंत्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ‘आयसोलेट’ करून कोरोना टेस्ट करून घ्यायला सांगितलं आहे. गृहमंत्री महोदय हे सांगत असतील तर कॅबिनेटला उपस्थित असणारे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावे लागेल, असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अयोध्येत जाऊन भूमिपूजन करतील. उमा भारती शरयू किनार्यावरून ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील. आडवाणी, मुरली मनोहर दिल्लीत बसून रामजन्मभूमी लढ्याचा गोड शेवट अनुभवतील. बाकी मंचावरचे प्रमुख अतिथी श्रीरामांचे मंदिर उभारणीचे कार्य पुढे नेतील. संपूर्ण देश अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याने रोमांचित झाला आहे. देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नाही. करोना वगैरे आहेच. तो अयोध्या, उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात आहे. रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून हा चिमटा काढण्यात आला आहे. शहा एकांतवासात तरीही गेहलोत सरकारला धोका कायम अमित शहा यांच्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो, अशी आम्ही श्रीरामचरणी प्रार्थना करीत आहोत. गृहमंत्री शहा यांच्यावर करोनाने झडप घातली व शहा यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी खूश व्हायचे कारण नाही. अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्रक्रिया करीत असतात. त्यामुळे गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे. गृहमंत्री एकांतवासात गेले तसे गेहलोत यांनाही त्यांच्या आमदारांना घेऊन एकांतवासात जावे लागले. म्हणजेच धोका कायम आहे!, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेनं काय म्हटलं? >> गणेश पूजनाची सुरुवात झाली असतानाच देशातील अनेक प्रमुख नेते करोना पॉझिटिव्हने आजारी पडून इस्पितळात दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना संसर्ग झाला. सध्या ते गुडगावमधील इस्पितळात पडून आहेत. >> अयोध्येतील सुरक्षा तसेच इतर व्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर होती, पण गृहमंत्री साहेबांनाच करोनाने पकडावे, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे संन्यासी मुख्यमंत्री योगी महाराज व इतर निमंत्रित तर असतीलच, पण गृहमंत्री शहांशिवाय हा संपूर्ण सोहळा फिकाच पडेल. >> अयोध्येत करोना संक्रमणाचा कहर उडाला आहे हेच सत्य आहे. राममंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र महाराज यांच्यासह अनेक सेवक, सुरक्षा रक्षकांना कोरोनाने पकडले आहे. उत्तर प्रदेश तर करोनाचा भयंकर हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे व त्यातून अयोध्याही मुक्त नाही. >> पंतप्रधान मोदींचे निकटवर्ती म्हणून तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसर्या क्रमांकाचे प्रमुख सहकारी म्हणून शहा हे पंतप्रधानांच्या निकट असतात, पण श्रीरामाच्या आशीर्वादाने पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांचा बालही बाका होणार नाही. या कामी राहुल गांधी यांनी अमित शहांना दिलेल्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. हे सर्व अयोध्येतील मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर घडत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fqcxHP
No comments:
Post a Comment