Breaking

Wednesday, August 5, 2020

सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर सुरू; मुंबईकरांनो घरीच थांबा! https://ift.tt/3ibEwwt

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर आजही मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. येत्या २४ तासांत मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईचं जनजीवन ठप्प झालं. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आणि घरांमध्ये पाणी शिरले. रेल्वेरुळावर पाणी आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली. मुंबईत काल सखल भागात कमरेच्यावर पाणी साचलं होतं. काल रेल्वे रुळांवर जवळपास तीन फुट पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या ४५ जणांचे एक चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे तात्काळ हटविण्यात आली आहे. या सर्वांची दखल घेऊन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या संकटात मी तुमच्यासोबत आहे, असं म्हटलं असून केंद्र सरकारकडून आवश्यकते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, आज सकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जोर धरला आहे. मुंबईत कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, सायन, दादर, वांद्रेसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आजही मुंबईसह कोकणात होण्याची शक्यता असल्याने मुंबईत पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याचाही अंदाज असल्याने प्रशासनाने मुंबईकरांना आधीच घरी थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. ४५ वर्षातला विक्रमी पाऊस काल मुंबईत दिवसभरात ३२८.२८ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात पडलेला आजवरचा हा सर्वात मोठा पाऊस आहे. गेल्या ४५ वर्षांत ऑगस्ट महिन्यात पडलेला हा विक्रमी पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलं. शिवाय काल मुंबईत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, असंही हवामान खात्याने सांगितलं. पेडर परिसरात भिंत कोसळली दरम्यान, सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावासमुळे पेडर रोड येथे केम्स कॉर्नरजवळ एक भिंत कोसळली असून अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. वृक्ष आणि मातीचा ढिगारा रस्त्यावरमध्येच येऊन पडल्याने या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा आणि झाडे दूर करण्यात येत आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Pv9TGg

No comments:

Post a Comment