Breaking

Sunday, August 16, 2020

लडाख: LAC वरून मागे हटणे दूरच; चिनी सैन्य करतेय 'हे' काम https://ift.tt/3kQ4A2l

बीजिंग: लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC)ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणारे चिनी सैन्य अद्यापही मागे हटण्यास तयार नाही. एकीकडे भारतासोबत सुरू असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्याची टिमकी वाजवणाऱ्या चिनी सैन्याने आता लडाखमधील पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिक केबल लाइन टाकण्यास सुरुवात केली आहे. ओपन इंटेलिजेंस सोर्स detresfa ने भारतीय माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. detresfa या भागातील काही सॅटेलाइट छायाचित्रेही समोर आणली आहेत. लडाख आणि अक्साइ चीन भागातील चिनी सैन्याची संख्या कमी झाली असली तरी १५९७ किमी अंतरावर त्यांची सैन्य अद्यापही असून मागे हटलेले नाही. लडाखमध्ये चिनी सैन्याच्या या हालचालींना चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाकडून परवानगी मिळाली आहे. हा विभाग राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अखत्यारीत येतो. वाचा: चीनकडून सातत्याने शांतता आणि स्थिरता यावर भाष्य करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच असल्याचेही समोर आले आहे. भारतीय सैन्याने पँगोग त्सोमधील जुने प्रशासनिक तळ हटवण्याची मागणी चीनने केली आहे. इतकंच नव्हे तर, कुगरंगमधील डोंगराळ भागातून भारतीय सैन्याला माघार घेण्यास चीनकडून सांगण्यात आले आहे. वाचा: वाचा: चीनकडून करण्यात आलेली ही मागणी भारतीय सैन्याने फेटाळून लावली आहे. सध्या असलेल्या ठिकाणी आपले सैन्य कायमच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची कोणतीही मागणी पूर्ण करणार नाही आणि असलेली स्थिती कायम ठेवण्यात येणार आहे. लष्करी आणि कूटनीतिक बैठकांनंतर चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून मागे हटण्यास तयार नाही. त्यानंतर भारतीय सैन्याने देखील कुगरंग नदीवर आपली जागा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने घुसखोरी करण्याआधी असलेली स्थिती पूर्वपदावर यावी अशी मागणी भारताने केली आहे. दरम्यान, भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नामुळे तणाव निर्माण झाला आहे. तणाव निवळण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर अनेक चर्चेच्या फैऱ्याही पार पडल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत. भारताने सीमा प्रश्न आणखी जटील करू नये चीनने म्हटले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून लडाख येथील चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेतून अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. त्यावर चीनने म्हटले की, सीमेवर आणखी तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कारवाई भारत करणार नाही अशी चीनला अपेक्षा आहे. सीमा भागात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षातील संबंध चांगले होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असेही चीनने काही दिवसांपूर्वी म्हटले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34aocsb

No comments:

Post a Comment