Breaking

Tuesday, August 4, 2020

भूमिपूजन Live: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन https://ift.tt/31kY5f5

Bhumi pujan: आज ५ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. आज दुपारी १२ वाजून ४४ मिनिटे आणि १५ सेकंदांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या कोनशिलेची स्थापना करतील आणि त्यानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू होईल. पाहुयात, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... Live अपडेट्स... >> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानाहून सकाळी ९.३५ वाजता प्रस्थान करतील >> अयोध्या: राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास आपल्या आश्रमातून सकाळी १०.३० वाजता राम जन्मभूमीसाठी होणार रवाना. >> अयोध्या शहराची सर्व प्रवेशद्वार बंद, अयोध्येत कोणत्याही वाहनाला प्रवेश करण्यात आला बंद >> पाहा (क्लिक करा आणि पाहा प्रस्तावित राम मंदिराची छायाचित्रे) >> राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात वापरण्यात येत असलेले चांदीचे फावडे आणि चांदीची कणी >> दुपारी बरोबर १२ वाजून ४४ मिनिटे आणि १५ सेकंदांनी पंतप्रधान मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करतील. >> >> दुपारी साडे बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रम स्थळी पोहोचतील. त्यांच्या हस्ते १५ मिनिटे पूजन होईल, त्यानंतर ते संकल्प करती. >> राम मंदिरात शिळा स्थापन करण्याचा कार्यक्रम सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल, ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालेल- राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदेव गिरी यांची माहिती. >> ही बातमी वाचा- >> मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि नृत्य गोपालदास उपस्थित राहतील. >> राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५ नेते उपस्थित राहतील. >> आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असून संपूर्ण अयोध्येत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DF8M3R

No comments:

Post a Comment