Breaking

Tuesday, August 4, 2020

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात https://ift.tt/2ERCxzg

पुणे: दोन दिवसांपूर्वीच करोनामुक्त झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील -निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यात किडनी विकारानं निधन झालं. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर त्यांचे नातू होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नगर: उपनेते, माजी मंत्री यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड, सून असा परिवार आहे. मुंबई: आज अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असतानाच शिवसेनेने त्यावर मनातील सल बोलून दाखवली आहे. ३० वर्षे राम मंदिराचा लढा सुरू होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले, पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्यायामूर्ती रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DkHqjR

No comments:

Post a Comment