Breaking

Thursday, September 24, 2020

यूपीतील नव्या फिल्मसिटीवरून शिवसेनेचा मोदी सरकारला टोला https://ift.tt/2EwNQwZ

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात ‘’ उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. योगींच्या या निर्णयाच्या निमित्तानं शिवसेनेनं केंद्र सरकारला टोला हाणला आहे. ‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने काश्मीरमध्ये अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. यूपीतील यमुना प्राधिकरण क्षेत्रात किमान एक हजार एकरांत फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली याचे काम होणार आहे. पुढच्या दोन-अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं योगींच्या या धडपडीचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडमधील सध्याच्या समस्यांचा आढावा घेताना शिवसेनेनं योगींना काही गोष्टींबाबत सावधही केलं आहे. सध्या हैदराबादची ‘रामोजी फिल्मसिटी’ व मुंबईच्या गोरेगावातील ‘चित्रनगरी’ यात चांगले काम सुरू आहे. पण मुंबईतील आर के स्टुडिओ तर आता विकलाच गेला आहे. कमालिस्तान, मेहबूब वगैरे मोठे स्टुडिओ हे अडचणींशी सामना करीत आहेत. ‘फिल्मसिटी’ किंवा ‘चित्रनगरी’ उभारण्याची कल्पना चांगली आहे, पण तो चालवणे किती कठीण होऊन बसले आहे, त्याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. वाचा: 'मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यास ‘मायानगरी’चे अस्तित्व हे कारण आहेच. गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते ‘गर्दुल्ले’ बनले आहेत. त्यांनी आपापल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे चित्र पद्धतशीरपणे निर्माण केले जात आहे,' असा आरोपही शिवसेनेनं केला आहे. वाचा: 'याच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा वापर पंतप्रधान मोदी व अनेक राज्यांनी आपापल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करून घेतलाच आहे. गुजरातमध्ये मोदी व सलमान खान पतंग उडवीत होतेच. अमिताभ बच्चन तर गुजरातचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होते. पंतप्रधान मोदी यांची ‘आंबे’ खाण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती याची सखोल माहिती जनसामान्यांना प्राप्त व्हावी म्हणून अक्षय कुमार यांच्यावर खास जबाबदारी होती. मोदी यांच्यावरील चित्रपटात विवेक ऑबेरॉय तर ‘मनमोहन’ सिंग यांच्यावरील चित्रपटात अनुपम खेर यांनी कमाई केलीच आहे. म्हणजे मुंबईच्या चित्रपटसृष्टीतूनच निघालेल्या किरणांनी राज्यकर्त्यांना प्रकाशमान केले आहे. या चित्रपटसृष्टीच्या गळ्यास नख लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व हे कायमच राहील,' असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/363Swph

No comments:

Post a Comment