Breaking

Thursday, September 24, 2020

बिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता https://ift.tt/3i20lOT

नवी दिल्ली : आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगानं एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. देशात करोना संक्रमणाचा धोका वाढलेला असताना या पहिल्याच मोठ्या निवडणुका ठरणार आहेत. त्यामुळे एक वेगळंच आव्हान आणि राजकीय पक्षांसमोरही असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. गेल्या निवडणुकीत पाच टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. यंदा निवडणुकीत करोना गार्डलाईन्सचा पालन हेच मोठं आव्हान ठरणार आहे. वाचा : वाचा : निवडणूक आयोगानंही कोविड प्रोटोकॉलनुसार काही गाईडलाईन्स जाहीर केल्या. यानुसार, मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या सीमित करण्यात आलीय. सर्व मतदान केंद्रांवर मतदात्यांना मास्क परिधान करून आणि सॅनिटायझरचा वापर करूनच येण्यास सांगण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, हँडफ्री सॅनेटायझिंग आणि शरीराचं तापमान मोजण्याचं यंत्र यांचा वापर करण्यात येणार आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी बूथ पूर्णपणे सॅनेटाईज करण्याची सूचना करण्यात आलीय. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RZa5i1

No comments:

Post a Comment