नवी दिल्ली: () यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक (Twitter Account Hacked) करण्यात आले आहे. हॅकरने कोविड-१९ रिलीफ फंडासाठी डोनेशनम्हणून बिटकॉइनची मागणी केली आहे. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आलेल्या रिलीफ फंडात देणगी द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आले होते. आणखी एका ट्विटमध्ये हॅकरने लिहिले की, 'अकाउंट जॉन विक (hckindia@tutanota.com) याने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम हॅक केलेले नाही.' मात्र, आता ही ट्विट डिलीट करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत बेवसाइटचे एक ट्विटर अकाउंट आहे. या अकाउंटवर २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदी यांचे वैयक्तिक बेवसाइटचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याला ट्विटरची दुजोरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक बेवसाइटचे एक अकाउंट अनेक ट्विट्ससह हॅक करण्यात आले असे ट्विटरने देखील गुरुवारी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची माहिती आपल्याला असून त्यांचे अकाउंटच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. आम्ही या प्रकरणाची तपासणी करत असून या वेळी आम्हाला त्यांच्या इतर अकाउंटही हॅक झालेत किंवा कसे, याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही, असे ट्विटरच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे पेटीएम मॉलच्या डेटा चोरीत आले होते जॉन विक ग्रुपचे नाव पेटीएम मॉलच्या डेटा चोरीत जॉन विक ग्रुपचे नाव आले होते. जॉन विक ग्रुपने पेटीएम मॉलचा डेटा चोरी केला होता, असा दावा सायबर सेक्युरिटी फर्म सायबलने ३० ऑगस्टला केला होता. या हॅकर ग्रुपने खंडणीची मागणी केल्याचा दावाही सायबलने केला होता. मात्र, पेटीएमने हा दावा फेटाळून लावला होता. आमच्या डेटाची चोरी झाल्याची घटना घडलेली नसल्याचे पेटीएमने स्पष्ट केले होते. क्लिक करा आणि वाचा- काय आहे बिटकॉइन बिटकॉइनची सुरुवात २००९ मध्ये झाली होती. बिटकॉइनची किंमत सतत वाढत आहे. आज याची किंमत १० लाखांच्या पुढे गेली आहे. ही एक प्रकारची डिजिटल करंसी आहे. बिटकॉइनची सुरुवात एलियस सतोशी नावाच्या एका व्यक्तीन केली होती. भारतात देखील गुप्तपणे बिटकॉइन ट्रेडिंग केली जाते. मात्र, सरकारने याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. बिटकॉइन ट्रेडिंग डिजिटल वॉलेटद्वारे होते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34XXEL5
No comments:
Post a Comment