मुंबई : मागील दोन सत्रात भांडवली बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली आहे. लडाखमधील भारत आणि चीनमधील लष्करी तणाव आणि पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासाची घसरगुंडी यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. मात्र त्यातही आणि आगेकूच करत आहेत. बुधवारी निफ्टी ११५०० अंकांवर स्थिरावला. मात्र सध्या शेअर बाजार विशिष्ट बाबतीत प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे. गुंतवणूकदारांनी सावध राहणे आवश्यक आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी व्यक्त केले. अल्प कालावधीसाठी निफ्टी सकारात्मक राहील. त्यात आणखी वाढ होईल, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक नागराज शेट्टी यांनी व्यक्त केला. निफ्टीसाठी ११३५० ते ११४०० च्या दरम्यान सपोर्ट आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान कर्जहप्ते वसुलीला स्थगितीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बुधवारी या प्रकरणात व्याज आणि दंडात्मक शुल्क आकारावे की नाही यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात दिवसभर यावर युक्तिवाद झाला. आज पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे. बँकांनी व्याज माफ करावे यासाठी,कर्जदार , ऊर्जा कंपन्यांची शिखर संघटना, शॉपिंग मॉल असोसिशन यांनी याचिका दाखल केल्या आहेत. मात्र काल झालेल्या युक्तिवादाचा शेअर बाजारात पडसाद उमटले. बँकांच्या शेअरवर मोठा परिणाम झाला. तेजीच्या वाटेत खो घालणाऱ्या नफेखोरांमुळे आणि निफ्टीत अडथळा निर्माण झाला आहे. बाजारात एकाचवेळी तेजीची लाट आणि विक्रिचा सपाटा असा अनुभव सध्या गुंतवणूकदार घेत आहेत. बुधवारच्या सत्रात वित्तीय, दूरसंचार आणि धातू समभागांच्या तेजीने दिवसअखेर निर्देशांकांनी वाढ नोंदवली. बाजार बंद होताना निफ्टीत ६४.३५ अंकांची वृद्धी झाली व ११,५३५ अंकांची पातळी ओलांडली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील १८० अंकांनी वाढून ३९०८६ अंकांवर स्थिरावला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jzV5my
No comments:
Post a Comment