Breaking

Monday, October 5, 2020

मार्चमध्ये मिळणार करोनाची लस?; सरकारने सुरू केली मोठी तयारी https://ift.tt/2Gt4luV

नवी दिल्ली: करोना महासाथीवर लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगातील वैज्ञानिक युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. काही लशी या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. तर, भारतात देखील तीन लशींपैकी दोन लशी पुढील वर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सरकारने लशीचे वितरण करण्याची तयारी देखील सुरू केली आहे. खरे तर, सरकारला देखील पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोविड-१९ ची लस उपलब्ध होण्याची आशा आहे. पाहा, सरकारला का आहे इतकी आशा गुरुवारी सरकारने लस तयार करण्याच्या प्रमुख कंपन्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत करोनाची लस महिन्यापर्यंत उपलब्ध होईल असे संकेत मिळाले आहेत. मात्र, हे सर्व दोन्ही लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी होणे आणि विशेषज्ञांच्या परवानगीवर अवलंबून असणार आहे. लशीसाठी सुरू झाली आहे मोठी तयारी सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लशीची टाइमलाइन, रेग्युलेटरी संस्थांकडून मिळणाऱ्या मंजुरीची प्रक्रिया, लशीची उपलब्धता, वितरण आणि इतर आव्हानांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (SII), भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत भाग घेतला. मार्चपासून मिळणार लस? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत महत्वाच्या मंत्रालयीन विभागांचे सचिव, आरोग्य विभाग, ICMR आणि फार्मास्युटिकल्स यांनी देखील १ ऑक्टोबरला झालेल्या या बैठकीत भाग घेतला. सर्व काही ठीक चालले तर मार्च महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते असे त्यांनीही म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- लशीचा प्रगती अहवाल मागवला देशातील सुमारे २५ कोटी जनतेला जुलै २०२१ पर्यंत लस देण्याची योजना सरकार बनवत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली होती. त्या वेळी सरकारकडे ४०० ते ५०० मिलियन लशीचे डोस उपलब्ध असू शकतात असे आरोग्यमंत्री म्हणाले होते. लस निर्मिती कंपन्यांकडेही लस निर्मितीच्या प्रगतीची माहिती मागवण्यात आली आहे, असेही एका सूत्राने सांगितले. या व्यतिरिक्त लशीची संख्या आणि सरकाडून हव्या असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मदतीच्या गरजेबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांकडून सरकार किती डोस खरेदी करेल याचे आश्वासन सरकारने लस निर्मिती कंपन्यांना दिलेले नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lkdfJM

No comments:

Post a Comment