नवी दिल्ली: गेल्या ८ महिन्यांपासून करोनाविरुद्ध (Corona in India) लढाई लढणाऱ्या देशाला काहीसा दिलासा देणारे वृत्त आहे. सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर महासाथीचा आलेख आता ५० टक्क्यांनी खाली घसरला आहे. करोनाने शिखर गाठल्यानंतर रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घसरणीचीच नोंद अधिक झाल्याचे स्पष्ट होत आहे. (death and cases in india now half as compare to peak time) गेल्या सात दिवसांची सरासरी पाहिली असता गुरुवारपर्यंत देशात ४७,२१६ रुग्ण दररोज आढळत होते. ही संख्या १७ सप्टेंबरच्या करोनाने शिखर गाठलेल्या संख्येच्या अर्धीच आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, करोनाचा संसर्ग तीव्र गतीने होत असताना गेल्या एका आठवड्यापासून ५० टक्के कमी रुग्णवाढ होत आहे. ७ दिवसांचा सरासरीचा आलेख गतीने घसरला सात दिवसांचा सरासरीचा आलेख वाढीच्या तुलनेत अधिक गतीने खाली घसरलेला दिसत आहे. जेव्हा १९ सप्टेंबरला करोना संसर्गाने शिखर गाठलेले असताना करोनामुळे ११७६ इतके मृत्यू झाले होते. तर, २९ ऑक्टोबरला मृत्यूची संख्या ५० टक्क्याने घटून ती ५४३ इतकी झाली होती. ५२ दिवसांत करोनाने गाठले शिखर, ४२-४३ दिवसांत घसरण सध्या दररोज रुग्णवाढीची गती जुलैच्या स्तरावर आहे. गेल्या सात दिवसांची सरासरी २७ जुलैच्या संख्येत्या आसपास आहे. त्यावेळी रुग्णसंख्या ४६,७६० इतकी होती. यानंतर ५२ दिवसांमध्ये १७ सप्टेंबरला करोनाचे रुग्ण दुप्पट होत संख्येने शिखर गाठले. या संख्येच्या ५० टक्के घट येण्यासाठी ४२-४३ दिवसांचा कालावधी लागला. मृत्यूंची सरासरी १५ जुलैच्या संख्येच्या जवळ दररोज होणाऱ्या मृत्यूबाबत बोलायचे झाल्यास ही संख्या १५ जुलैच्या संख्येच्या बरोबरीची आह. त्यावेळी दिवसाला सरासरी ५३८ मृत्यू होत होते. याचा अर्थ करोनामुळे होणारे मृत्यूंचे शिखर १९ सप्टेंबरला ६५ दिवसांमध्ये गाठले गेले. तर दुसरीकडे घसरण होण्यास ४१ दिवसांचा कालावधी लागला. क्लिक करा आणि वाचा- शुक्रवारी आढळले ४८,४९६ नवे रुग्ण करोनाच्या रुग्णसंख्येने शिखर गाठल्यानंतर केवळ दोनच दिवसांमध्ये तीव्र गतीने घसरण होणे हे आश्चर्यचकीत करते. शिखर गाठण्यासाठी सर्वसाधारणपणे १० ते १५ दिवस लागतात असे मानले जाते. याचे नेमके कारण काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान शुक्रवारी देशभरात एका दिवसात वाढलेल्या रुग्णांची संख्या ४८,४९६ इतकी होती. तर एका दिवसापूर्वी गुरुवारी रुग्णवाढीची संख्या ४९,०७० इतकी होती. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kJMaQl
No comments:
Post a Comment