Breaking

Friday, October 23, 2020

हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून कसा सुटला?: शिवसेना https://ift.tt/2TiEc4K

मुंबई: 'बिहारच्या सत्तेसाठी भाजपने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा?,' असा रोकडा सवाल शिवसेनेनं केला आहे. बिहारमध्ये सत्ता आल्यास सर्वांना मोफत लस देण्याचे आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. हे आश्वासन भाजपच्या अंगलट आलं आहे. या मुद्द्यावरून देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेनेनं ही संधी साधत भाजपवर रोजच्या रोज टीकेचे बाण सोडणं सुरू केलं आहे. आज पुन्हा एका ''च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 'एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं सांगतात. दुसरीकडं भाजपचे इतर नेते सत्ता दिल्यास मोफत लस वाटण्याचे आश्वासन देतात. भाजपचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. करोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची व राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: संपूर्ण देशात करोनाचे थैमान आहे, ७५ लाखांच्या पुढे आकडा गेला आहे, माणसे रोज प्राण गमावत असताना लसीचे राजकारण व्हावे, तेही एका राज्याच्या निवडणुकीसाठी हे धक्कादायक आहे. बिहारच्या निवडणुकीतून ‘विकास’ हरवला आहे. रोटी, कपडा, मकान, रोजगार हे मुद्दे चालत नाहीत. कारण त्याबाबत सगळा दुष्काळच आहे. सर्वत्र बेरोजगारी व गरिबीचा कहर आहे. त्यावर उतारा म्हणून मोफत लस टोचण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. संपूर्ण देशालाच करोनावरील लसीची गरज आहे, पण ‘लस’ आधी बिहारात भाजपास मतदान करणाऱ्यांना मिळेल, असं भाजप सांगतोय. मग बिहारमध्ये भाजपचं सरकार न आल्यास ही लस बिहारला देणार नाही काय? अनेक राज्यांत भाजपची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदाराला करोना झालाच तर ‘लस टोचून घ्यायची असेल तर आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!’ असंही भाजप सांगू शकतो. त्यामुळे करोनावरील मोफत लसीने लोकांत संभ्रम निर्माण केला आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यांत भाजप विचारांची सरकारे नाहीत. दिल्ली प्रदेशात केजरीवाल भाजप विरोधाचा झेंडा घेऊन उभे आहेत. या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mgvSPj

No comments:

Post a Comment