Breaking

Saturday, October 24, 2020

सद्यस्थिती १९६२सारखी नाही, अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा चीनला इशारा https://ift.tt/2Tmsqqf

इटानगर : 'आताची स्थिती १९६२पेक्षा वेगळी आहे. चिनी सैन्याने कितीही वेळा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि भारताच्या भूमीवर हक्क सांगण्याचा दावा केला, तरी अरुणाचल प्रदेशचे नागरिक व भारतीय लष्कराचे जवान कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही,' अशा शब्दांत राज्याचे यांनी चीनला इशारा दिला. भारत आणि चीनमध्ये सन १९६२ला झालेल्या युद्धात हुतात्मा झालेले यांच्या ५८व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खांडू बोलत होते. जोगिंदर सिंह यांचे शौर्य आणि त्यांचे बलिदान कधीही विसरू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'हे १९६२ नाही; तर २०२० आहे. आता स्थिती बदलली आहे. जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतचे सर्व नागरिक आता तयार आहेत. तशी वेळ आल्यास अरुणाचल प्रदेशचे नागरिक भारतीय जवानांसोबत उभे राहतील.' वाचा : वाचा : लष्कराने पाडले पाकचे 'ड्रोन' दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील ताबा रेषेच्या परिसरात भारतीय लष्कराने शनिवारी पाकिस्तानचे ड्रोन पाडले. केरन क्षेत्रात शनिवारी सकाळी ही घटना घडली. पाकिस्तानचे ड्रोन डीजेआय मॅव्हिक २ या चिनी कंपनीने (क्वाडकॉप्टर) तयार केले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने विविध माध्यमांतून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने सीमा भागातील जवानांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील तीन सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला, तसेच उखळी तोफांचा मारा केला. आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यास प्रत्युत्तर दिले. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पाकिस्सतानने पूंच जिल्ह्यात देग्वार सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यानंतर सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील सीमांवरही पाकिस्तानने गोळीबार केला. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37EgjwX

No comments:

Post a Comment