मुंबई: टीआरपी घोटाळ्यात दिवसागणिक नवनवीन प्रकार समोर येत असून या प्रकरणात संशयित असलेल्या वाहिन्यांनी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आरोपींनी आर्थिक व्यवहारासाठी थाटल्या होत्या असे तपासातून उघड झाले आहे. आर्थिक व्यवहाराचे काही पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री पवई येथून हरिष पाटील(४५) या व्यक्तीला अटक के ली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद आहे मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले असून आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. यातील एका पथकाने गुरूवारी हरिष पाटील याला अटक केली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद असून त्यापैकी कॅप्स लॉक डीजीटल सोल्यूशन नावाच्या कंपनीद्वारे एका संशयीत वाहिनीचे आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. पथकाने प्रत्यक्ष शहानिशा केली असता दिलेल्या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी आढळली नाही. या कंपनीचे देशभरात १४२२ वेण्डर असून पाटील त्यापैकी एक आहे. पाटील याच्या अटकेने या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या ९ वर पोहचली आहे. रिपब्लीक वाहिनीचे सीएफओ शीवा सुंदरम अणि वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांची शुक्रवारी तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2FTOncU
No comments:
Post a Comment