Breaking

Monday, October 26, 2020

करोनाबाबत आणखी एक गुड न्यूज; १०१ दिवसांत सर्वात कमी रुग्ण https://ift.tt/35FzCDx

नवी दिल्ली:देशात करोनाविरोधातील लढाईदरम्यान आता आशेचा किरण दिसू लागला आहे. करोनाच्या नव्या रुग्णवाढीत आता घसरण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी भारतात करोनाचे ३६ हजार ६०४ नवे रुग्ण आढळले असून हा आकडा गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे. या पूर्वी १७ जुलैला ३५ हजार ०६५ नवे रुग्ण आढळले होते. आता १०१ दिवसांमध्ये करोनाचा आलेख मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाच्या वाढीवर नियंत्रण मिळाले आहे. या राज्यांमध्ये करोनाच्या नव्या रुग्णवाढीत घसरण झाल्याचे दिसत आहे. याचे परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसले आहे. तेव्हा एका दिवसात ९० हजार ते ९७ हजार नवे रुग्ण आढळत होते. करोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू सोमवारी करोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबरच करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढून ती १ लाख १९ हजार ४९६ इतकी झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ६५२ इतकी आहे. यात ६ लाख ३० हजार ५४६ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १६ टक्के रुग्ण कमी च्या नव्या रुग्णांमध्ये या आठवड्यात (१९-२५ ऑक्टोबर) सर्वात मोठी दिसून आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १६ टक्के कमी नवे रुग्ण आढळले. तर, मृत्यूचचा संख्या देखील या कालावधीत १९ टक्क्यांनी कमी राहिलेली आहे. या आठवड्यात ३.६ लाखांहून काहीसे अधिक रुग्ण आढळले आहेत. ही संक्या गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी संख्या आहे. क्लिक करा आणि वाचा- गेल्या ६ आठवड्यांपासून येतेय गुडन्यूज या पूर्वी २०-२६ जुलैच्या दरम्यान, करोनाचे ३.२ लाख रुग्ण होते. गेल्या आठवड्यात देशात सुमारे ४.३ लाख रुग्णांची नोंद झाली. देशात कोविडने शिखर गाठल्यानंतर (७-१३ सप्टेंबर) रुग्ण संख्या कमी होत जाण्याचा हा सततचा सहावा आठवडा आहे. या बरोबर भारतात ही महासाथ आता आटोक्यात येऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kxTJK4

No comments:

Post a Comment