मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग २४ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत ८७.७४ रुपये आणि ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. लिबियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्राने पुन्हा उत्पादन सुरु केल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. मात्र मागणीत उदासीनता कायम असल्याने तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकी तेलसाठा मागील आठवड्यात १ दशलक्ष बॅरलपर्यंत होता. कारण डेल्टा चक्रीवादळाने किनारीभागातील कामकाज ठप्प होते. तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने सौदी अरेबियातील क्रूड निर्यातीला गती मिळाली. ऑगस्ट २०२० मध्ये ही निर्यात दररोज ५.९७ दशलक्ष एवढी होती. साथीच्या आजाराचा विळखा वाढतच राहिला तर उत्पादन कपात आणखी वाढवणार असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले. आज सिंगापूरमध्ये कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.६० टक्क्यांनी घसरले आणि ३९.२५ डॉलर प्रति बॅरलवर खुले झाले. तसेच ब्रेंट क्रूडचा भाव ०.५० टाक्यांनी घसरून ४१.१८ डॉलर प्रती बॅरल खुला झाला. उत्पादन कपातीमुळे तेलाला काहीसा आधार मिळेल. युरोप व उत्तर अमेरिकेतील विषाणू प्रसार व लॉकडाऊन स्थइतीमुळे तेलाच्या अर्थकारणावर परिणाम होऊन दरांवर आणखी दबाव आला आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या पेट्रोलसाठ्याची पातळी ११.९ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढली असून बाजारपेठेच्या अपेक्षेच्या तुलनेत म्हणजेच, १.८ दशलक्ष बॅरलच्या तुलनेत कमी आहे. तेलाच्या मागणीतही घट कायम आहे. लिबियातील क्रूड उत्पादनातही वाढ झाली असून सर्वात मोठे तेलक्षेत्र शरारा येथे पुन्हा उत्पादन सुरु झाल्याने तसेच मागणीतील उदासीनतेने तेलातील नफ्यावर मर्यादा आल्या. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची चिंता आणि लिबियातील उत्पादन वाढीमुळे नफ्याबाबत साशंकता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HDXM9e
No comments:
Post a Comment