Breaking

Thursday, October 15, 2020

'...अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरचा विश्वास उडेल' https://ift.tt/3k4OiBY

मुंबई: परतीच्या पावसानं राज्याला दिलेल्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री यांना घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. (MNS appeal to ) वाचा: मागचे काही दिवस राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळला. कापणीला आलेली पिके बघता-बघता भुईसपाट झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळं राज्यातील शेतकरी हादरून गेला आहे. मदतीसाठी त्यांचा आक्रोश सुरू आहे. मनसेचे नेते यांनी जालना जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. व्हिडिओमध्ये पाण्यानं भरलेलं शेत दिसत आहे. त्यात पिके वाहून गेली आहेत. सगळी मेहनत पाण्यात गेल्याचं पाहून हादरलेला येथील शेतकरी चिखलात लोळताना दिसत आहे. सरकारनं लक्ष देण्याची विनवणी करतो आहे. वाचा: नांदगावकरांनी हाच संदर्भ देत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल.' करोना लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शक्यतो घरातूनच राज्याचा गाडा हाकत आहे. याबद्दल आतापर्यंत त्यांच्यावर अनेकदा टीका झाली होती. मुख्यमंत्र्यांनीही त्यास प्रत्युत्तर दिले होते. घरातून राहून मी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असेन तर प्रवासात वेळ घालवण्याची आणि लॉकडाऊनचे नियम मोडण्याची गरज काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी टीकाकारांना केला होता. आता शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचा हवाला देऊन मनसेनं मुख्यमंत्र्यांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. त्यास मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lRGFiV

No comments:

Post a Comment