नवी दिल्ली: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ( ) आयोजनासाठी करोनाची काळजी घेण्यासंबंधित नवी कृती मानक () प्रक्रिया जारी केली आहे. या एसओपीमध्ये कोविड-९ (Covid-19)संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना सांगितलेले आहेत. कलाकार आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना एक अधिकृत कोविड-१९ निगेटीव्ह रिपोर्ट द्यावा लागणार आहे. तसेच मास्क (Mask) न घालता कोणालाही कार्यक्रमांना प्रवेश देण्यात येणार नाही. त्याच बरोबर कार्यक्रमस्थळी केवळ ५० टक्के सीट भरण्याचीच परवानगी देण्यात आली आहे. (New issued by the Ministry of Culture) केंद्र सरकारने जारी केलेल्या एसओपीचे अनुपालन थिएटर प्रबंधन आणि अनेक संस्थांना करावे लागणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील संस्था, सभागृहे किंवा कोणतेही खुले स्थान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाड्याने घेणाऱ्यांना देखील या एसओपीचे पालन करावे लागणार आहे. कार्यक्रमांच्या तिकिटांसाठी डिजिटल पद्धतीला प्राथमिकता दिली जाईल, असेही एसओपीत म्हटले आहे. निषिद्ध क्षेत्रात मात्र कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसेल. क्लिक करा आणि वाचा बातमी: प्रेक्षकांसाठी मास्क आणि... सर्व बाहेरील कलाकार आणि लायटिंग, साउंड, मेकअप, कॉस्ट्यूम इत्यादी पुरवठा करणाऱ्यांसह त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही एक कोविड-१९ निगेटीव्ही रिपोर्ट यजमान संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा लागेल, असे एसओपीत म्हटले आहे. ही तपासणी कार्यक्रमाच्या सात दिवस आधी झालेली असली पाहिजे. प्रेक्षकांना मास्क परिधान करणे अनिवार्य असणार आहे. तसेच प्रत्येक वेळी कमीतकमी सहा फुटांचे शारीरिक अंतर राखणेही आवश्यक आहे. क्लिक करा आणि वाचा बातमी: क्लिक करा आणि वाचा बातमी-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37bX5yk
No comments:
Post a Comment