नवी दिल्ली : वेगवेगळ्या सरकारी धोरणांचा निषेध म्हणून ट्रेड युनियनकडून आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय. या देशव्यापी आंदोलनात ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन (AIBEA) चाही सहभाग आहे. अहवालानुसार, भारत बंदमध्ये २५ कोटी श्रमिकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. आजच्या या देशव्यापी आंदोलनात १० हून अधिक केंद्रीय श्रमिक संघटना आणि राज्य कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. याशिवाय असंगठीत क्षेत्रातील संघटनांचे श्रमिकही यात सहभागी होणार आहेत. भाजपशी संबंधित (BMS) मात्र या आंदोलनात सहभाग नाही. संपाचा बँकांना फटका? सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमधील कर्मचारी या संपात सहभागी होतील. त्यामुळे बँकांच्या व्यवहारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षण बचाव संयुक्त मंचाअंतर्गत शिक्षक भारती, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (एमफुक्टो), बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टु) व इतर संघटना या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. सध्या शाळांचे वर्ग ऑनलाइनच सुरू आहेत. त्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता नाही, असं सांगण्यात येतंय. वाचा : वाचा : मुंबईत संपाचा मोठा परिणाम होईल, अशी चिन्हे नसली तरी पुण्यासारख्या शहरात रिक्षा वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुण्यातील बाजारांतही त्याचा परिणाम दिसेल. नाशिक जिल्ह्यातही असा परिणाम दिसू शकतो. दिल्लीत शेतकऱ्यांचंही आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये संपासोबतच शेतकऱ्यांचं आंदोलनही सुरू आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातून अनेक शेतकरी दिल्लीकडे आगेकूच करत आहेत. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2KI8UDq
No comments:
Post a Comment