
अहमदनगर: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीमधील खरे हिरो आरजेडी नेते तेजस्वी यादव असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार यांनी व्यक्त केलेयं. बिहारच्या निवडणुकीत भाजपला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. यावरूनही पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं,’ अशी टिका पवार यांनी भाजपवर केली आहे. वाचा: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडीला जनतेने कौल दिला आहे. निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केला. तर, आरजेडी आणि काँग्रेस आघाडीला बहुमत गाठता न आल्याने सत्तांतर घडवण्यात अपयश आले आहे. या निवडणुकीची मतमोजणी आज, पहाटेपर्यंत सुरू असली तरी काल, मंगळवारी रात्री अकरापर्यंत या निवडणुकीत एनडीए बाजी मारणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. याच दरम्यान रोहित पवार यांनी ट्विट करीत बिहार निवडणुकीवर भाष्य केलंय. ‘बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमारजी हे त्याच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल,’ असेही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट करतानाच एकप्रकारे भाजपवर निशाणा साधला आहे. वाचा: वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38sCkzj
No comments:
Post a Comment