मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता अवघ्या महाराष्ट्राचे राज्याच्या अर्थसंकल्पावर लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आता समोर आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे १० मार्च रोजी विधान परिषदेत या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन दिवस आणि विविध खात्यांच्या मागण्यांवर पाच दिवस चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. या पुरवणी मागण्यांच्या चर्चेसाठी दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. दोन दिवसांच्या चर्चेनंतर मंजुरी दिली जाणार आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस आणि विविध खात्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पाच दिवस निश्चित करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधिमंडळाकडून तात्पुरता तीन आठवड्यांचा कामकाजाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. ८ आणि ९ मार्च रोजी अधिवेशनासाठी सुट्टी असणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, १० मार्च रोजी सादर केला जाईल. यानंतर, दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरू होणार. तर दुसऱ्या आठवड्यात, १४ मार्चला होळीची सुट्टी असणार आहे. यानंतर थेट १७ ते २१ मार्च दरम्यान विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hr5BTDj
No comments:
Post a Comment