मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपसह विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यावर नेते यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक या सदरातून विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे. तसंच, वृत्तपत्र स्वातंत्र्यावरही राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'अर्णब गोस्वामी या वृत्तवाहिनीच्या मालकास पोलिसांनी आत्महत्या प्रकरणात पकडताच अनेकांना चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याची उबळ आली. रिया चक्रवर्तीच्या अटकेसाठी ज्यांनी मोहीम राबवली त्यांना त्याच गुन्ह्यात अटक झाली. तेव्हा तो वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला कसा करु शकतो? असा सवाल करतानाच वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले आहे,' अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. 'ट्रम्प यांची अमेरिकेतून गंच्छती प्रक्रिया सुरु असतानाच अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात देशातील प्रमुख राजकीय पक्ष भाजप रस्त्यावर उतरला. गोस्वामी यांची अटक म्हणजे देशाच्या चौथ्या स्तंभावर म्हणजे मीडियावर हल्ला असे सांगण्यात आले. गोस्वामी यांनी गुन्हा केला आहे. त्यांनी मुंबईतील एका मराठी उद्योजकाचे पैसे बुडवले. त्या तणावातून अन्वय नाईक व त्याच्या वृद्ध आईने आत्महत्या केली. नाईक यांच्या मृत्यूस गोस्वामी जबाबदार आहेत अशी सुसाईड नोट मृत्यूपूर्वी लिहून ठेवली. हा पुरावा असताना आधीच्या भाजप सरकारने या सर्व प्रकरणाचा गळाच दाबला,' असा आरोप संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर केला आहे. 'त्या दडपलेल्या गुन्ह्याची पुन्हा चौकशी करणे हा काय अपराध झाला? पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कसा हल्ला होऊ शकेल? पंतप्रधान मोदी वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अर्णब गोस्वामींच्या बाजूने उभे राहिले व मृत अन्वय नाईक, त्यांची पत्नी, मुलगी यांचा आवाज दडपण्यात आला. हे प्रकरण निर्भया, हाथरसकांडापेक्षा भंयकर आहे,' असंही राऊत म्हणाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35acldP
No comments:
Post a Comment