Breaking

Tuesday, November 24, 2020

अहमद पटेल : काँग्रेसची वन मॅन आर्मी https://ift.tt/33eWOIo

कधीच सत्तेत नसतानाही कायम राज्य करणारा पहिला बिगर गांधी नेता म्हणून ओळख असलेले यांचं करोनाने निधन झालं. काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त गरज असताना अहमद पटेल यांची एक्झिट चटका लावणारी आहे. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे निकटवर्तीय होते. काँग्रेसच्या प्रत्येक संकटात त्यांनी संकटमोचकाची भूमिका निभावली आणि प्रत्येक संकटातून काँग्रेसला मार्ग दाखवला. असाच किस्सा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होतानाही घडला होता. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीची चर्चा झाली. पण हे अकल्पनीय असल्याचं मत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडलं. हे तीन पक्ष एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणं सहज शक्य होतं. पण यासाठी गरज होती ती काँग्रेस अध्यक्षा यांच्या परवानगीची. पहिल्यांदा शरद पवार सोनिया गांधींना भेटले. नंतर उद्धव ठाकरेंनीही सोनिया गांधींना संपर्क साधला. पण सर्व काही व्यर्थ गेलं. दबाव वाढत असतानाच काँग्रेसचे काही राज्यातील नेते आणि शरद पवार यांनी अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली. सर्वांना माहित होतं की एवढी एकच व्यक्ती अशी आहे, जी तिढा सोडवू शकते. यानंतर अहमद पटेल अॅक्शन मोडमध्ये आले. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी आपली भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे सोनिया गांधींना त्यांनीच पटवून दिल्याचं सांगितलं जातं. अखेर काँग्रेसने हिरवा कंदील दिला आणि पुढे काय झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. कधीच सत्तेत नसूनही अहमद पटेल यांनी सतत पक्षात आपला दबदबा ठेवला. भाजपचा सर्वात जुना सहकारी पक्ष शिवसेनेलाही सोबत घेतलं. महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्याचं श्रेय काँग्रेसमधून पूर्णपणे अहमद पटेल यांनाच जातं. गुजरातमधून आठ वेळा खासदार, काँग्रेसचे कोषाध्यक्ष, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. २००४ च्या निवडणुकीतील विजय, २००८ मधील अविश्वास ठरावातील विजय आणि २००९ मध्ये पुन्हा सत्ता कायम ठेवणं यात अहमद पटेल यांची भूमिका वन मॅन आर्मीसारखी आहे. तेलंगणा राज्य निर्मितीवेळी पाठिंबा, प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा मिळवणं यातही अहमद पटेल यांनी मोठी भूमिका निभावली. तालुका पंचायतीपासून सुरू झालेली अहमदभाईंची कारकीर्द केंद्रापर्यंत पोहोचली. अत्यंत शक्तीशाली नेता अशी ओळख असतानाही त्यांनी नेहमीच प्रकाशझोतातून दूर राहणं पसंत केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी एका युवा नेत्यातील कौशल्य पाहिलं, त्याला संधी दिली आणि वयाच्या २६ व्या वर्षी खासदार बनवलं ते नेता अहमद पटेलच होते. तेव्हापासूनच राजीव गांधींसोबत कामाचा अनुभव, नंतर सोनिया गांधींचे राजकीय सचिव म्हणून संकटमोचक ठरणं हे अहमद पटेल यांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य आहे. पण काँग्रेसला सर्वात जास्त गरज असतानाच घेतलेली एक्झिट ही मनाला टोचणारी आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3m3UfA1

No comments:

Post a Comment