Breaking

Tuesday, November 10, 2020

विजय बिहारमध्ये, जल्लोष हैदराबादेत; ओवेसी तेजस्वींवर भारी https://ift.tt/35iySFc

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी जनमत चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महाआघाडीच्या आशेवर पाणी फेरले. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठा झटका (Tejasvi Yadav) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दलाला (RJD) लागला आहे. आतापर्यंत मुस्लिम वोटबँकेला आपल्या सोबत कायम राखणाऱ्या भागात असदुद्दीन (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (AIMIM) 'जोर का झटका' दिला आहे. ओवेसींच्या पक्षाने या परिसरात ५ जागा मिळवल्या आहेत. या विजयासोबकच आवेसी यांच्या हैदराबाद येथील घरात त्यांच्या समर्थकांनी उत्सव साजरा केला. ( aimim wins 5 seats in in bihar election) AIMIM ता जलवा, आरजेडी अपयशी AIMIM ने बिहार निवडणुकीत २० उमेदवार उभे केले होते. यांपैकी १४ उमेदवार सीमांचलल भागात उभे होते. ओवेसींच्या पक्षाने यात ५ जागा जिंकल्या आणि उर्वरित १५ जागांवर मते कापून आरजेडीला मोठे नुकसान झाले आहे. AIMIM ने अमोर, कोचाधमान, बहादुरगंज, बैसी आणि जोकीहाट या जागांवर मोठा विजय प्राप्त केला. आरजेडीच्या गडावर AIMIM चा बंपर विजय आरजेडीचा गड मानल्या गेलेल्या बैसीमध्ये AIMIM चे उमेदवार सईद रुकनुद्दीन यांनी आरजेडीचे हाजी अब्दुस सुभान यांना तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. भाजपचे उमेदवार विनोद कुमार येथे दुसऱ्या स्थानावर राहिले. ओवेसींनी या परिसरात जोरदार प्रचार केला होता. आणि CAA आणि NRC च्या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. सन २०१९ मध्ये किशनगंज पोटनिवडणुकीत AIMIM ने पहिल्यांदाच विजयाचा स्वाद चाखला. क्लिक करा आणि वाचा- AIMIM च्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा हैदराबादमध्ये जल्लोष बिहार निवडणुकीत AIMIM च्या विजयानंतर ओवेसी यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आतापर्यंत निवडणुकांमध्ये मते कापणारे अशी प्रतिमा असलेल्या ओवेसी यांच्या पक्षाने ५ जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सीमांचल येथे विजयामुळे AIMIM आरजेडीसाठी मोठा धोका बनला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32xWLHe

No comments:

Post a Comment