मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २७ पैशांनी वधारले आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात इंधन महागले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ४८ इंधन दर जैसे थे ठेवले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात शुक्रवार ते मंगळवार असे सलग पाच दिवस भाववाढ केली.बुधवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तीन दिवस पुन्हा एकदा इंधन दरात वाढ केली. याआधी शुक्रवारी पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २४ पैशांनी महागले होते. तर गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ११ पैसे तर डिझेलमध्ये २१ पैसे वाढ केली होती. तीन दिवसात पेट्रोल ५४ पैशांनी आणि डिझेल ७२ पैशांनी महागले आहे. आजच्या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.८१ रुपये आणि डिझेल ७८.६६ रुपये झाला आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८२.१३ रुपये असून डिझेल ७२.१३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.१२ रुपये असून डिझेल ७७.५६ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.६७ रुपये आहे. डिझेलचा भाव ७५.७० रुपये प्रती लीटर झाला आहे. सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव ०.१८ टक्क्यांनी घसरला आणि प्रती बॅरल ४५.५३ डॉलर झाला. त्याचबरोबर यूएस वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव ४८.१८ डॉलर इतका झाला. क्रूडचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर आहे. दरम्यान, तेलाच्या किमती आणि उत्पादनाबाबत होणारी ओपेक देशांची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेत इंधन मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे तूर्त ओपेक देशांनी बैठक पुढे ढकलली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3og5oPh
No comments:
Post a Comment