मुंबई: 'मुख्यमंत्री असलो तरी माझे पाय जमिनीवर आहेत. त्याचबरोबर क्लचवर आहेत, ब्रेकवर आहेत, एक्सिलेटरवर आहेत आणि हातात स्टेअरिंगपण आहे,' असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. राज्याची गाडी माझ्याच हातात असल्याचं त्यांनी यातून अधोरेखित केल्याचं बोललं जात आहे. वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं. आघाडीतील मोठा भाऊ म्हणून सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आलं. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारणात मुरलेले पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना कारभार करता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आजही याबाबत उलटसुलट वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी शरद पवारांना भेटलं पाहिजे. तेच राज्य चालवतात, अशी खोचक टीका विरोधी पक्षाचे नेते करतात. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे की ? असा प्रश्न अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. वाचा: काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दोघांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्या फोटोमध्ये अजितदादा व उद्धव ठाकरे एका गाडीत बसलेले दिसत होते. गाडीचं स्टेअरिंग अजितदादांच्या हातात होतं. त्यावरून जोरदार चर्चा रंगली होती. वाचा: सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत मंत्रालयात, सह्याद्रीवर जातात हे महाराष्ट्र प्रथमच पाहतोय, असा प्रश्न 'सामना'चे संपादक यांनी उद्धव ठाकरे यांना केला होता. करोनाच्या नियमांमुळं मला असं करावं लागतं, असं उत्तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्याचबरोबर, माझ्या हातात स्टेअरिंग आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2KJqPcW
No comments:
Post a Comment