Breaking

Wednesday, November 11, 2020

भाजप नेत्या उमा भारतींकडून तेजस्वी यादवांचं कौतुक https://ift.tt/38yiQsS

भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री () यांनी बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Elections) आणि मध्य प्रदेश पोटनिवडणुकीनंतर (MP Bypoll) आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. उमा भारती यांनी विरोधी पक्षांच्या गटाचं अर्थात महाआघाडीचं नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते () यांचं अगदी तोंडभरून कौतुक केलंय. 'तेजस्वींमध्ये बिहारचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे परंतु, आणखी थोड्या काळानंतर...' अशी सूचक प्रतिक्रिया उमा भारती यांनी दिली. 'तेजस्वी एक चांगला मुलगा आहे. परंतु, सध्या मात्र ते राज्याचा कारभार हाताळण्यासाठी सक्षम नाहीत. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बिहारला पुन्हा एकदा जंगलराजकडे ढकलून दिलं असतं. तेजस्वी नेतृत्व करू शकतात परंतु आणखीन थोडा मोठं झाल्यानंतर. सध्या तेजस्वी यांच्याकडे एखाद्या राज्याचा कारभार हाताळण्याइतका अनुभव नाही' असं उमा भारती यांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय. वाचा : वाचा : इतकंच नाही तर उमा भारती यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Kamal Nath) यांचंही कौतुक केलं. 'कमलनाथ यांनी ही निवडणूक खूप चांगल्या पद्धतीनं लढली. त्यांनी आपलं सरकार योग्य पद्धतीनं चालवलं असतं तर कदाचित इतक्या अडचणी आल्या नसत्या. ते एक सभ्य व्यक्ती आहेत, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी ही निवडणूक अतिशय चतुराईनं हाताळली' असंही उमा भारती यांनी म्हटलं. बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या निकालात राष्ट्रीय जनता दलानं (RJD) ७५ जागांवर विजय मिळवलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपनं ७४ जागा आपल्या ताब्यात घेतल्यात. तर जेडीयूला ४३, काँग्रेसला १९, एलजेपी १ आणि इतरांना ३१ जागा मिळाल्यात. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eQYEnb

No comments:

Post a Comment