Breaking

Sunday, November 22, 2020

सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली, महिला अडकली! https://ift.tt/3lVhMTL

मुंबई: परिसरात एका सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. दुर्घटनाग्रस्त शौचालयात एक महिला अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. कुर्ला पश्चिमेकडील नाझ हॉटेलच्या जवळ ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाली. जखमी महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. तिला पुढील उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. मागील काही दिवसात व आसपासच्या शहरात इमारतीचे भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबईत अलीकडंच एक जुनी इमारत कोसळली होती. त्याआधी भिवंडी येथे अशीच दुर्घटना घडली होती. आणखी वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35UJevq

No comments:

Post a Comment