हरयाणा/ नवी दिल्ली: प्रेयसीला दिवाळीनिमित्त कार गिफ्ट करायची असल्याने २६ वर्षीय तरूणाने कार अडवून दोघांकडील ४० लाख रुपये लुटल्याची घटना येथे घडली. ४ नोव्हेंबरला ही लुटीची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे, अशी माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. सुरेंद्र उर्फ सोनू असे आरोपीचे नाव आहे. त्याने सोनीपतजवळ कार अडवून दोघांना लुटल्यानंतर पुढच्या पाच दिवसांत लुटलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये खर्च केले होते. तो महागडी कार खरेदी करणार होता. पण त्याआधीच त्याने केलेल्या लुटमारीच्या घटनेविषयी पोलिसांना माहिती मिळाली. १० नोव्हेंबरला पोलिसांनी सापळा रचला आणि दिल्लीबाहेरील नरेला परिसरात त्याला अटक केली. त्याच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे. हरयाणाच्या सोनीपतमधील खारखोडा पोलीस ठाण्यात सोनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लूट आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. याआधी त्याच्यावर नरेला पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. अशी केली होती लूट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी खारखोडा परिसरात सोनू याने कार अडवली. कारमध्ये दोघे जण बसले होते. त्यांनी भीतीने दार उघडले नाही. सोनू याने दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे कारमधील दोघे खाली उतरले. सोनूने त्यांच्याकडील ४० लाख रूपये घेतले आणि त्याच्याकडील कारमधून फरार झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35vcoBi
No comments:
Post a Comment