Breaking

Friday, November 13, 2020

पाकचा जळफळाट होणार! PM मोदी जवानांसोबत 'इथे' साजरी करणार दिवाळी https://ift.tt/35sOJkI

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी ( ) करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानातील जैसलमेर सीमेवर पोहोचले आहेत. पीएम मोदींसोबत सीडीएस बीपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना आहेत. जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तानची सीमा आहे. बीएसएफचे जवान येथे तैनात असतात. प्रसिद्ध तनोट माता मंदिर देखील इथं आहे. जैसलमेरच्या लोंगेवाला सीमेवर बीएसएफ जवानांसमवेत दीपावली साजरी करणार आहेत. लोंगेवालमध्ये बीएसएफची एक पोस्ट आहे. गेल्या वर्षी २७ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. जवानांच्या पोशाखात पीएम मोदी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले आणि त्यांना मिठाई दिली. यापूर्वी २०१८ मध्ये पीएम मोदींनी उत्तराखंडमध्ये लष्कराचे जवान आणि आयटीबीपी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. दीपावलीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एका दिवा सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी लावण्याचं आवाहन केलं आहे. 'या दिवाळीमध्ये, सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी एक दिवा लावा.. सॅल्यूट टू सोल्जर्स. जवानांच्या अद्भभूत धैर्याबद्दल आपल्या अंतःकरणावरील आभार हे शब्दातून मांडता येऊ शकत नाही. सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचेही आभारी आहोत', असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lHZp4w

No comments:

Post a Comment