नवी दिल्ली : प्रत्येक पत्नीला आपल्या किती आहे? हे जाणून घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. विशेषत: पोटगी मिळवण्याच्या उद्देशानं ती ही माहिती मिळवू शकते. पतीचा पगार जाणून घेण्यासाठी पत्नी माहितीच्या अधिकाराचाही ( / ) वापर करू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या २०१८ च्या एका आदेशानुसार, कायदेशीर पत्नी म्हणून विवाहित महिलेला आपल्या पतीचा पगार जाणून घेण्याचा संपूर्ण हक्क आहे. गुरुवारी केंद्रीय सूचना आयोगानं एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान या महत्त्वाच्या गोष्टीचा पुनरुच्चार केला. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आयोगानं माहिती न देण्याच्या एका आदेशाला रद्दबादल ठरवलं. यासोबतच जोधपूरच्या आयकर विभागाला १५ दिवसांच्या आत महिलेला पतीच्या पगाराबद्दल सर्व माहिती देण्याचे आदेश दिले. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lZAF8f
No comments:
Post a Comment