Breaking

Wednesday, November 25, 2020

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एसटी बसला अपघात; १ ठार, १५ जखमी https://ift.tt/3q0UNt5

सुनीत भावे/ बंडू येवले : पुणे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात एक ठार, तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हा अपघात आज मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त बस सातारा येथून मुंबईच्या दिशेनं येत होती. येथील कोन गावाजवळच्या एक्झिट मार्गावर असताना एका अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत बसचा एका बाजूचा पत्रा कापला गेला. त्यामुळं १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर बसचा चालक जागीच ठार झाला. जखमींममध्ये काही महिलांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच आयआरबीची यंत्रण व महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणखी वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33joQlR

No comments:

Post a Comment