Breaking

Thursday, November 26, 2020

गुजरातमध्ये कोविड हॉस्पिटलला आग, ५ रुग्णांचा होरपळून मृत्यू https://ift.tt/3q6Cm68

राजकोट: येथील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. ( in Rajkot) मावडी भागातील उदय शिवानंद रुग्णालयात आज पहाटे ही दुर्घटना घडली. आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी सहा जण थोडक्यात बचावले तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. वाचा: आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं असून सर्व रुग्णांना इतरत्र हलविण्यात आलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमध्ये अशीच एक घटना घडली होती. अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3l8MZSs

No comments:

Post a Comment