Breaking

Thursday, November 26, 2020

Live दिल्ली चलो : शेतकरी आक्रमक, राजधानीच्या सीमेवर तणाव https://ift.tt/39hQ686

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शेतकरी हरयाणा सीमेवर ठाण मांडून राहिले. आजदेखील शेतकऱ्यांकडून दिल्लीत दाखल होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रोहतकमध्ये '' आंदोलनासाठी एकत्र जमलेले शेतकरी झज्जर सीमेवर गोळा झाले आहेत. शेतकरी मोर्चाला हिंसक वळण गुरुवारी, कृषी विधेयकांच्या निषेधार्थ पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी काढलेल्या 'दिल्ली मार्च'ला पंजाब-हरयाणा सीमेवर अंबाला येथे हिंसक वळण लागले. दिल्लीकडे कूच करणाऱ्यांमध्ये पंजाब, , उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि केरळच्या शेतकऱ्यांचा; तसेच पाचशे शेतकरी संघटनांचा समावेश असून ते शुक्रवारी दिल्लीत आंदोलन करणार आहेत. वाचा :वाचा : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूच या तिन्ही कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडन केल्यानंतरही सरकार हमी भाव संपुष्टात आणेल, अशा शंकेने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीवर मोर्चा काढून चाल करून येणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अंबालाजवळ पाण्याचे फवारे मारले आणि अश्रुधूराचा वापर केला. शेतकऱ्यांनीही मोर्चा रोखण्यासाठी लावलेले संरक्षण कठडे उचलून घग्घर नदीत फेकून दिले आणि दगडफेक केली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली-हरियाणा सीमेवर पाच हजार पोलिस, तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सीमा सील करून आठ जागांवर नाकेबंदी केली आहे. सावधतेचा उपाय म्हणून दिल्ली आणि शेजारच्या शहरांमधील मेट्रो सेवाही दुपारी दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांना हरियाणामध्ये शिरू देणार नाही, अशी घोषणा करून हरियाणा सरकारने दिल्ली-चंडीगड महामार्ग बंद केला असून, गुडगाव आणि फरीदाबादचे दिल्लीकडे जाणारे रस्ते, तसेच उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवरील रस्ते बंद केले आहेत. यांना अटक या आंदोलनात शेतकऱ्यांसह सामील होण्यासाठी येत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना बुधवारी रात्री आग्र्याच्या सीमेवर रोखून अटक करण्यात आली. हमी भाव हिरावून घेणाऱ्या कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेण्याऐवजी भाजप सरकार त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहे. शेतकऱ्यांकडून सारे काही हिसकावून धनाढ्यांना बँका, कर्जमाफी, विमानतळे, रेल्वे स्थानके दिली जात असल्याची टीका करीत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. केंद्र सरकारची तिन्ही विधेयके शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या शांततामय आंदोलनाच्या अधिकाराला बळजबरीने रोखले जात असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ljIi8x

No comments:

Post a Comment