चंदीगड: सीमा सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत बुधवारी रात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. अमृतसरजवळ असलेल्या अटारी सीमेवर रात्री धुक्याचा फायदा घेऊन हे दोन घुसखोर घुसखोरी करत होते. हे लक्षात येताच सुरक्षा दलाने इशारा दिला. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. यातच दोघे ठार झाले. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. या दोन घुसखोरांकडे हत्यारे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिकडील काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. या पूर्वी २३ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा सेक्टरमध्ये एक घुसखोर भारतीय सीमेत प्रवेश करत होता. त्यावेळी सीमा सुरक्षा दलाने त्याला ठार केले होते. कुपवाडा येथेही दोन घुसखोरांना केले होते ठार तर, ७-८ नोव्हेंबरला काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांची घुसखोरी सुरक्षा दलांनी हाणून पाडली होती. दहशतवाद्यांविरोधातील लष्कराच्या या कारवाईत भारताचे ३ जवान शहीद झाले होते. ७ नोव्हेंबरच्या रात्री सुमारे १ वाजता १६९ व्या बटालियनने गस्त घालत असताना माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरांची हालचाल पाहिली होती. क्लिक करा आणि वाचा- सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सडेतोड उत्तर देत असताना दोन घुसखोर ठार झाले. तसेच, ऑगस्ट महिन्यात गुजरात-राजस्थान सीमेवर पहिल्यांदाच घुसखोरीची घटना उघड झाली. या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका घुसखोराला ठार केले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2K3Zm5T
No comments:
Post a Comment